रत्नागिरी : रस्त्यावर मोकाट गुरं, सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम

banner 468x60

शांत असलेल्या कोकणात सोशल मीडियाच्या पोस्टमुळे काय होतं हे अलीकडेच अनुभवलेले आहे. तरीदेखील काही समाजकंटकांमुळे शांत असलेल्या कोकणात पुन्हा धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

banner 728x90

कोकणातील हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्याची परंपरा देशात प्रचलित आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्याचे सर्वात मोठे प्रतीक कोकणातील माणसं आहेत हे ठामपणे आपण सांगू शकतो.

मात्र रत्नागिरीमध्ये एका समाजकंटकांने सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी एक पोस्ट व्हायरल केलीय. रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या मोकाट गुरांमुळे एका समाज कंटकाने शुक्रवारी सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी एक पोस्ट व्हायरल झाल्यामुळे.

सकल हिंदू संस्थेन या तरुणा विरोधात तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.रत्नागिरी शहरामध्ये जागोजागी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली गुरे दिसून येत असतात. त्यामुळे काही वेळा अपघात होउन काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

बुधवारीच शिरगाव-गणेशवाडी येथे रस्त्यालगतच्या भूमिगत डीपीच्या अर्थिंगचा शॉक लागून एका मोकाट गुराचा मृत्यू झाला. नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात मोकाट गुरांचा त्रास सतत वाढत आहे.

या मोकाट गुरांच्या प्रश्नावरुनच संशयित तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सदर पोस्ट शहरात व्हायरल झाल्यावर सकल हिंदू संस्थेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *