रत्नागिरी : वाळूमाफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

banner 468x60

वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर फावड्याने हल्ला करणाऱ्या दोघांना गेडाम यांनीच चोप दिला.

banner 728x90 banner 728x90

शुक्रवारी सकाळी पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. वाळू माफियांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे वाळू चोरीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे.

गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

माफियांकडून फावड्‌याने हल्ला

जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेमंड रेस्टहाऊसच्या मागील बाजुला

असलेल्या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या त्यावेळी त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या. याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या वाळू भरून जात होत्या तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकरवाड्याच्या दिशेने उभा होता. त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *