कोकण : पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वरंध घाट पुन्हा बंद

banner 468x60

वरंध घाट पुन्हा बंद करण्यात आला आहे. १ मे पासून काही दिवसांकरीता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

परंतु आता पुन्हा एकदा घाटातील कामे सुरू करण्यात आल्याने हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे शहरातून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता त्यांच्यासाठी वरंध घाट बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.

वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.वरंध घाटात रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामे सुरू आहेत.

ही कामे सुरू असताना अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव १ एप्रिलपासून ३० मे पर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुक पाहता कोकणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घाटातील रस्ता सुरु करण्याची मागणी महाडचे आमदार भारत गोगावले यांनी केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच झालेल्या चर्चेनंतर १ मे पासून काही दिवसांकरीता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा घाटीतल कामे सुरू करण्यात आल्याने हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

असा असणार पर्यायी मार्ग
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शॉर्टकट मार्ग होतो. परंतु आता फेऱ्याचा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा.

तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर- खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *