संगमेश्वर : देवळे येथे भीषण आग ,दुकान जळून खाक

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील किराणा माल आणि जनरल स्टोअर्स या दुकानाला सोमवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले.

banner 728x90

यामध्ये दुकानाचे कनकाडी येथील मालक तानाजी सखाराम गार्डी यांचे ३ लाख ७५ हजार रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत देवरूख तहसिल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कनकाडी येथे राहणारे तानाजी सखाराम गार्डी यांचे करंबेळे तर्फे देवळे येथे किराणा माल आणि जनरल स्टोअर्सचे दुकान आहे.

हे दुकान त्यांनी नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री बंद करून कनकाडी येथील घरी गेले होते. या दुकानात त्यांनी विक्रीसाठी लागणारा सर्व माल भरला होता. मात्र सोमवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या दुकानाला अचानक आग लागली.

दुकानाला आग लागल्याचे येथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती तानाजी गार्डी यांना दिली. दुकानाला आग लागल्याचे समजताच तानाजी गार्डी यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला वेढा घातला होता. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. आगीच्या घटनेची खबर गावच्या तलाठ्यांना मिळताच तलाठी राम खडके यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

या पंचनाम्यात दुकानातील फ्रीज व सर्व साहित्य जळून ३ लाख ७५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच, ग्रा. पं. सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, दुकानाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *