संगमेश्वरः गाडी नदीत कोसळून 5 जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ब्रिटिशकालीन सोनवी पुलावरून मोटार नदीत कोसळली. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २५) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

banner 728x90 banner 728x90


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र वासुदेव अपराज-नालासोपारा, महेश शांताराम अपराज, नंदकुमार शांताराम टेमुलकर- मालवण, दीपक विलास अपराज, सुहास एकनाथ अपराज हे या अपघातात जखमी झाले असून,

त्यांच्यावर संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळ ब्रिटिशकालीन पूल आहे. सध्या ब्रिटिशकालीन पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या गाड्यांसाठी सद्यःस्थितीमध्ये ब्रिटिशकालीन सोनवी पुलावरून जावे लागते. होळीसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे आले आहेत.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार सोनवी पुलावरून कोसळली. २५ फूट दरीत गाडी कोसळल्यानंतर माभळे येथील ग्रामस्थांनी जखमींना वरती काढून रुग्णालयात हलविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *