रत्नागिरी : वरवडे खाडीत होडी उलटून बुडालेल्या 12 मुलींना वाचविण्यात यश

banner 468x60

शिमगोत्सवातील पारंपरिक पद्धतीप्रमाणे वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेली खारवी वाड्यातील खासगी बोट आज (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास बुडाली.

banner 728x90 banner 728x90

बोटीतील सुमारे १२ मुली पाण्यात पडल्या. मात्र, शिमगोत्सवामुळे किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमार उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ सर्व मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना मालगुंड आरोग्य केद्रात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

मात्र एकाच वेळी बुडालेल्या १२ मुलींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवी वाडा येथील समाजाची प्रथा आहे.

आज असलेल्या होळी निमित्त वरवडे येथील काही नौका खाडीत उतरल्या होत्या. यातील एक नौका खाडीत बुडाली. या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक माणसे असल्याने वजन वाढल्याने ही नौका खाडीत बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील जवळपास १२ मुली होत्या. संबधित नौका निलेश सुर्वे यांच्या मालकीची आहे.

बोट उलटताच बोटीतील मुलींनी एकच आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी बचावासाठी धाव घेतली. आजूबाजूला असलेल्या नौकांमधील ग्रामस्थांनी बुडालेल्या सर्वांना वाचविण्यात यश आले.

Ratnagiri News या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढलेल्या १२ मुलींना मालगुंड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. सर्व मुलींची प्रकृती उत्तम असल्याने सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, ऐन शिमगोत्सवात नौका बुडाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *