रत्नागिरी : महिला माजी आमदाराचा फोन येताच वाळू उत्खनन बंद

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथे दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उत्खनन सुरु होते. एका महिला माजी आमदाराने तहसीलदारांना फोन करून भंडारपुळ्यातील वाळू उत्खननाबाबत तक्रार केली.

ही तक्रार करताच प्रशासनाने भंडारपुळे येथील वाळू उत्खनन बंद केले. दिवसाढवळ्या वाळू उत्खनन सुरु असताना एका महिला माजी आमदारावर फोन करण्याची वेळ येते. अशावेळी खनिकर्म विभागाची आणि तहसीलदारांची भरारीपथके करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

रत्नागिरीच्या किनारप‌ट्टीवर बेसुमार वाळू उत्खनन सुरु आहे. वाळूमाफिया दिवसाढवळ्या वाळू उपसा करत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथे दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु होता. या बाबतची तक्रार एका महिला माजी आमदाराने तहसीलदारांकडे केली.

महिला माजी आमदाराचा फोन येताच तहसीलदाराने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि तत्काळ भंडारपुळे येथील वाळू उत्खनन थांबले.

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी परिसरातही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरु आहे. रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना संबंधित अधिकाऱ्यांना काळबादेवी येथील वाळू उत्खननावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *