आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीचा कार्यकारी असल्याचे भासवून फिर्यादीची अडीच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही फसवणूक बुधवारी (दि. ७) दुपारी १.४० ते सायंकाळी ५ वा. कालावधीत घडली आहे.
फेब्रुवारी महिन्यातील ऑनलाईन फसणुकीची ही तिसरी घटना आहे. या तिन्ही घटनांमध्ये मिळून अज्ञातांनी रत्नागिरीकरांना तब्बल १४ लाखांचा चुना लावला आहे. डॉ. सुधीर अकोजवार (रा. मारुती मंदिर विश्वनगर, रत्नागिरी) यांनी शनिवार २४ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, ७ फेब्रुवारी रोजी अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करून मी फेडेक्स या आंतरराष्ट्रीय कुरियर कंपनीचा कार्यकारी बोलत असल्याची बतावणी करत सुधीर अकोजवार यांचा विश्वास संपादन केला. त्या नंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ५२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी मुकेश गंदेचा यांची त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या नावे दोन संशयितांनी १० लाख रुपये तर खडपेवठार येथील तरुणाची जास्त कमीशन देण्याचे आमिष दाखवून अज्ञाताने सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
शहरातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पोलिस विभागासमोर या भामट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले राहिले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*