रत्नागिरी : माळनाक्यात चार मित्रांमध्ये राडा; एकजण गंभीर जखमी

banner 468x60

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील अद्वैत पेट्रोल पंपाच्या समोर चार मित्रांमध्ये किरकोळ कारणातून राडा झाला.

banner 728x90 banner 728x90

या राड्यात एकाला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार बुधवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

सूरज पुरुषोत्तम आडविलकर (२४, रा. गावडे आंबेरे- रत्नागिरी) असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे.

जिल्हा शासकीय रुणालयातून मिळालेल्या माहितीनुसार सूरज हा राजिवडा येथे बोटीवर नोकरी करतो. बुधवारी सायंकाळी तो माळनाका येथे मित्रांसमवेत असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून मित्रां-मित्रामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.

यामध्ये एका मित्राने त्याच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली.
मात्र दगड मारल्यानंतर जखमी अवस्थेत तिथेच होता. इतर मित्रांनी तेथून पलायन केले.

जखमी अवस्थेत आडविलकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *