रत्नागिरी : अवैध दारू धंद्याविरुद्ध पोलीस आक्रमक

banner 468x60

तालुक्यातील अवैध दारू धंद्यांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम उघडली असून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

त्यामध्ये तालुक्यातील वरवडे भंडारवाडा येथे बेकायदेशिरपणे विना परवाना गावठी हातभट्टीची 10 लिटर दारु विक्रीसाठी बाळगणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.55 वा. करण्यात आली. विवेक गजानन पाटील (57, रा. वरवडे भंडारवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस नाईक प्रसाद सोनावले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा गुरुवारी सायंकाळी गावठी हातभट्टीची 650 रुपयांची 10 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील साठरेबांबर येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 7 लिटर दारु विक्रीसाठी ताब्यात बाळगणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.15 वा. करण्यात आली. प्रविण कृष्णा नवले (45,रा.वायंगणे संगमेश्वर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा एका घराच्या मागील बाजुला आपल्या ताब्यात 350 रुपयांची 7 लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पावस ते पूर्णगड जाणार्‍या रस्त्यावर मेर्वी फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेल्या प्रौढाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकळी 7.55 वा.करण्यात आली. वरेश अशोक पाटील (40,रा.गावखडी भंडारवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल महेश अरविंद कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा मेर्वी फाट्याजवळ एका टपरीच्या मागे दारु पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *