रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलीस ठाणे स्तरावरील महिला मदत कक्ष यांच्यामार्फत पतीपत्नीमधील वाद, विविध कुटूंबांमधील वाद आणि कौटुंबीक कलहाच्या 2023 या वर्षात 192 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
महिला सुरक्षा विशेष कक्षाने समुपदेशन करत 141 कुटुंबातील वाद मिटवण्यात यश मिळवले आहे. महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, पतीपत्नीचे कौटुंबीक वाद, मोबाईलचा अतिप्रमाणात वापर, एकमेकांना वेळ न देणे, एकत्र कुटुंबात न राहणे, घरातील आर्थिक व्यवहार अशा विविध कारणांच्या तक्रारी आल्या होत्या.
महिला दक्षता समिती व भरोसा सेलमधील सदस्यांच्या मदतीने अर्जदार आणि गैरअर्जदार यांचे योग्य पध्दतीने समुपदेशन करुन 141 जोडप्यांमधौल वाद मिटवण्यात यश आले आहे. पतीपत्नीमधील वाद तसेच महिलांच्या सासरी होणाऱ्या छळाबाबत तक्रारी सामंजस्याने सोडवण्यासाठी रत्नागिरी
जिल्हा स्तरावर महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलीस ठाणे स्तरावर महिला मदतकक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी
असल्यास महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे किवा नजिकच्या पोलीस ठाण्यातील महिला मदत कक्षाकडे अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















