कोल्हापूर-रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारी अचानक धूर आला. शाॅर्टसर्किटमुळे येथील रेक्झिन वितळल्याने अचानक पेट घेतला.
मात्र, चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला.हा प्रकार रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे काल, साेमवारी दुपारी घडला.
काेल्हापूर-रत्नागिरी (एमएच १४, बीटी ४९४५) ही गाडी साेमवारी सकाळी ११ वाजता काेल्हापूर बसस्थानकातून सुटली.
या गाडीतून ५५ प्रवासी प्रवास करत हाेते. ही गाडी दुपारी रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला. चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारील रेक्झिन वितळून ते इंजिनला चिकटले आणि पेटले.
चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविली.
त्यानंतर आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.
काही वेळाने धूर थांबल्याची खात्री केल्यावर चालकाने बस सुरू केली. त्यानंतर ही गाडी प्रवाशांसह सुखरूप रत्नागिरी आगारात आणण्यात आली. चालकाच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















