तालुक्यातील नांदिवडे येथे विवाहबाह्य संबंधातून महिलीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात पती सुरेश धोंडू पडवळ (वय 64,रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) यांचा खून केला. ही घटना 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जयगड पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर (दोन्ही रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) या दोघांना रात्री उशिरा अटक केली.
या दोघांनी कट रचून हत्याराने सुरेश पडवळ यांच्या हाता-पायांवर, छातीवर आणि डोक्यावर मारून त्यांचा खून केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















