माथेफिरूने तीन ज्येष्ठांवर कुऱ्हाड व पहारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी ३:१५ वाजता पनारे-कवचेवाडी (ता. लांजा) येथे घडली.
या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य एकजण किरकाळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर लांजा पालिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.
जानू रघुनाथ कवचे (७०) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. तसेच सुरेश संभाजी कवचे (६०) हे गंभीर जखमी झाले असून, सुदेश गुणाजी कवचे (६०) हे जखमी झाले आहेत. दा घांनाही रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पनारे गावातील कवचेवाडी येथील एक माथेफिरू हातात कुऱ्हाड आणि पहार घेऊन फिरत हाता. त्याने आधी जानू कवचे यांच्या डाक्यात पहारीने प्रहार केला. हा प्रहार इतका जबरदस्त हाता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर त्या माथेफिरूने त्याच वाडीतील सुरेश कवचे यांच्या डाक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात ते गंभीर जखमी हाऊन जमिनीवर का सळले. त्यानंतर त्याने सुदेश गुणाजी कवचे यांच्यावरही कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले.
त्यानंतर हा माथेफिरू तिथून निघून गेला. याबाबत लांजा पा लिसांना माहिती देताच पालिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तसेच गंभीर जखमी झालेल्या सुरेश कवचे आणि सुदेश कवचे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पालिसांनी त्या माथेफिरूचा शाळेध घेऊन सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पालिस करत आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















