खेड : बचतगटाच्या महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिस कोठडी

banner 468x60

बचतगटांच्या महिलांना सवलतीच्या दरात शासनाकडून शिलाई मशिनसह घरकुलाचे आमिष दाखवून फसवणूकप्रकरणी अटक झालेल्या भामट्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

banner 728x90

त्याला दोन २ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने घेतलेली रक्कम हस्तगत करण्याचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. पोलिस कोठडी झालेल्याचे नाव बबन मारूती मोहिते (रा. वाराणी- कासार, बीड) असे आहे.

एका संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवत संदीप शंकर डोंगरे (रा. वाराणी-कासार, बीड) याने बबन मोहिते याच्या साह्याने बचतगटातील महिलांना विविध योजनांची आमिषे दाखवत तब्बल २३ लाख रुपये उकळले.

रक्कम देऊनही शिलाई मशिन, घरकुले व घरघंटी न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बचतगटातील महिलांनी पोलिस ठाणे गाठले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध तपास करत मुख्य सूत्रधार संशयित संदीप डोंगरेला ताब्यात घेतले.

त्यानंतर फरारी असलेल्या संशयित बबन मोहिते यालाही स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने मुंबईत अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत डोंगरे याच्याकडून ४ ते ५ वेळा फसवणुकीतील रक्कमेचा हिस्सा घेतल्याची कबुली मोहिते याने दिली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा येथील पोलिसांकडून पडताळा करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *