चिपळूण : दोन एस.टी. बसेसमध्ये अपघात, तिघे जखमी

Screenshot

banner 468x60

चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे पुण्याहून चिपळूण आगाराकडे येणाऱ्या दोन एसटी बसमध्ये अपघात झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

यात चालकासह तिघेजण जखमी झाले असून अपघातात दोन्ही बसगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही बसगाडीमधून ६७ प्रवासी प्रवास करत होते. श्रावण शंकर बुरटे, सुनिता श्रावण बुरटे, अंजली श्रावण बुरटे (सर्व गोवळकोट, देऊळवाडी) हे प्रवासी, तर चालक नेताजी शितोळे असे चौघेजण जखमी झाले आहेत. पुण्याहून रात्री ९.३० वाजता निघालेली पुणे-

चिपळूण तर चिंचवडहून रात्री १०.३० वाजता निघालेली चिंचवड-चिपळूण (शिवशाही) या दोन्ही बस गाडया चिपळूण आगाराकडे निघाल्या होत्या.
एकापठोपाठ असलेल्या या दोन्ही बस गाडया कुंभार्ली घाट उतरून पुढे पिंपळी मार्गाने चिपळूणला येत असताना त्याठिकाणी असलेल्या गतिरोधक पार करण्यासाठी पुणे-चिपळूण बसगाडीच्या एसटी चालकाने वेग कमी केला.

त्याचवेळी मागून आलेल्या चिंचवड- चिपळूण (शिवशाही) बस गाडीच्या चालकाने त्यापुढील बसगाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्या बस मधील मागील सीटवरील तिन्ही प्रवासी जखमी झाले.

पुणे-चिपळूण या बसगाडीमध्ये २४ प्रवासी, तर चिंचवड-चिपळूण (शिवशाही) मध्ये २३ प्रवासी होते. अपघात होताच प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे दोन्ही बस गाडयांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. शिवशाही बस गाडीतील प्रवाशांना अखेर अपत्कालीन मार्ग असलेल्या दरवाजातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

या अपघातात श्रावण शंकर बुरटे, सुनिता श्रावण बुरटे, अंजली श्रावण बुरटे (सर्व गोवळकोट, देऊळवाडी) हे प्रवासी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *