चिपळुणात बांगलादेशी घुसखोरी, चौघांना अटक

banner 468x60

चिपळूण शहरातील रावतळेसह मार्कंडी येथून अटक केलेल्या
बांगलादेशींनी पश्चिम बंगालमार्गे कालकात्याहून पुढे महाराष्ट्रात घुसखोरी केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

विशेष म्हणजे, कालकात्यातच त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दहशवाद विरोधी पथकाने शहरातील रावतळे येथून रुख्साना आलमगीर मंडल, आलमगीर अरबली मंडल या दोन बांगलादेशी पती-पत्नीला शहरातील रावतळे येथून ताब्यात घेत अटक केली.

त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चिपळुणात सापडलेले बांगलादेशी महाराष्ट्रात आले कसे, याचा शाळेध सुरू हाता. हे बांगलादेशी पश्चिम बंगालमार्गे येत असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

तसेच महंमद अली, असाद सिरीना या आणखी दोन बांगलादेशी तरुणांना रत्नागिरी दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे, तेही पश्चिम बंगालमार्गे पुढे महाराष्ट्रात आल्याची माहिती पुढे येत आहे. अटकेतील चौघा बांगलादेशींची सोमवारी पोलिस कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बांगलादेशी मंडल कुटुंब २००१ साली त्यांच्या मामासोबत पश्चिम बंगालमार्गे कालकात्यात आले. त्यानंतर, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.

अखेर त्यांनी महाराष्ट्र गाठले. कालकात्याहून महाराष्ट्रात आलेल्या मंडल दाम्पत्याला महाराष्ट्रात जवळपास २५ वर्षे झाली आहे. ते आपला उदारनिर्वाहासाठी बांधकाम व्यावसाय करून संसार चालवतात अशी माहिती समोर आलीय.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *