राजापूर : 50 घरांचे होणार स्थलांतर, दरडीचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

banner 468x60

राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर येथील ५० घरांना दरडीचा धोका असल्याने या घरांचे स्थलांतर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

banner 728x90 banner 728x90

त्यासाठी १६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे जुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यभरात पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे.

जून, जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने आवश्यक उपायोजना जिल्हा प्रशासन, पोलीस दलाने केल्या आहेत.

तर राजापूर, खेड, चिपळूण नगर परिषदेलाही आपत्तीपुर्व तयारी करण्याची सुचना देण्यात आली आहे. आपत्ती निवारणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री घेण्याची सुचना देण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाला प्रत्येकी एक लाकूड कटर, बॅटरी देण्यात आली आहे. जेणे करुन रस्त्यामध्ये झाडे कोसळल्यास ती तात्काळ बाजूला करुन वाहतुक सुरळीत करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर येथील एका वाडीला दरडीचा धोका आहे. त्या वाडीच्या वरच्या भागात भलामोठा दगड आहे. तो खाली आल्यास वाडीतील पन्नास घरांना धोका पोहचण्याची शक्यता आहे.

त्यामुळे त्या वाडीतील ५० घरे स्थलांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ कोटी रु. निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. खासगी जागा खरेदी करुन पन्नास घरांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे. सिंह म्हणाले. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘आपत्ती निवारणासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. राजापूर, खेड, चिपळूण येथे पूर आल्यास स्थानिकांच्या मदतीसाठी तीन नौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

तर एनडीआरची टिम लवकरच चिपळूण येथे दाखल होणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात पोलीस दल सतर्क राहणार असल्याचे ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *