अनंत गितेंचे कुणबी कार्ड नाही तर मुस्लिम कार्ड चालणार? राय’गड’ तटकरेंचा का की गितेंचा?

banner 468x60

रायगडमध्ये अनंत गितेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी ताकद लावली होती. गिते हे कुणबी समाजाचे आहेत. या समाजाची मोठी संख्या या मतदार संघात आहे. त्याचा फायदा गितेंना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाय तटकरे हे भाजपकडे गेल्याने मतदार संघातील मुस्लिम मतदार हा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मतदार गितेंकडे वळल्यास मोठा फटका तटकरेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रायगडमधील अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन या मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. ही ताकद गितेंना मिळाली तर त्यांचे बळ नक्कीच वाढणार आहे. शेकाप सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे.

हीबाब गितेंसाठी सकारात्मक समजली जाते. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेची ताकद तटकरेंना मिळणार आहे. ही तटकरेंची जमेची बाजू मानली जाते. रायगड लोकसभेत रायगडमधील पेण,अलिबाग,श्रीवर्धन आणि महाड हे चार मतदार संघ येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली आणि गुहागर हे मतदार संघांचा समावेश होतो.

पक्षीय बलाबल पाहीले असता महाड, दापोली आणि अलिबाग मतदार संघात शिंदे गटाचे आमदार आहेत. तर श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे या स्वत: आमदार आहे. पेणमध्ये भाजपचे आमदार आहे. तर गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आमदार आहे.

त्यानुसार महायुतीच्या ताब्यात पाच मतदार संघ आहे. तर आघाडीच्या ताब्यात एकच मतदार संघ आहे. त्यात महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या ठाकरेंच्या शिवसेनेत आल्या आहेत. ही बाबत ठाकरेंसाठी दिलासा देणारी ठरली आहे.

मतदार संघ आमदार पक्ष

पेण रवी पाटील भाजप

अलिबाग महेंद्र दळवी शिवसेना ( शिंदे गट )

श्रीवर्धन आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस

महाड भरत गोगावले शिवसेना ( शिंदे गट )

दापोली योगेश कदम शिवसेना ( शिंदे गट )

गुहागर भास्कर जाधव शिवसेना ( ठाकरे गट )

रायगड लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते विरूद्ध सुनिल तटकरे यांच्यात पुन्हा एकदा लढत होत आहे. 2014 साली गिते यांनी सुनिल तटकरे यांचा निसटता पराभव केला होता. हा पराभव तटकरेंच्या जिव्हारी लागला होता.

अगदी शेवटच्या फेरीपर्यंत तटकरे यांनी गितेंना टक्कर दिली होती. अखेर दोन हजाराच्या फरकाने त्यांना पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे या निवडणुकीत सुनिल तटकरे नावाच्या अजून एका उमेदवाराला दहा हजाराच्या घरात मतदान झाले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गिते यांचा तटकरे यांनी दणदणीत पराभव करत मागिल पराभवाची परतफेड केली होती.

आता 2024 च्या निवडणुकीतही हेच दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. या निवडणुकीतही एकमेकांना पराभव करण्याचेच दावे होत आहेत. प्रचाराच्या केंद्र स्थानी भ्रष्टाचारी विरुद्ध निष्क्रीय राजकारणी हे मुद्दे रहीले. तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले.

भाजपला ते कसे चालतात असा प्रश्न विचारला गेला. शिवाय आधी अंतूले बरोबर गद्दारी आणि आता शरद पवारां बरोबर गद्दारी हा मद्दाही चांगलाच रंगला. तर गिते हे कसे निष्क्रीय राजकारणी आहेत हे सांगितले गेले.

त्यांनी कुणबी म्हणून मते मागितली पण कुणबी समाजासाठी काही केले नाही असा ही त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या गडबडीत रोजगार, महागाई, मुंबई गोवा हायवे या सारखे मुद्दे मागे पडले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *