शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती जाहीर सभा घेणार आहेत.
येत्या गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात विशेषतः रोह्यात देखील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या भव्य अशा होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
रोहासहित संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या सभांमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. यावेळी ते पोलादपूर, म्हसळा, माणगाव, अलिबाग, रोहा आणि पेण येथे विभागवार सभा घेणार आहेत. सध्या सभेचे नियोजन करण्याचे काम सध्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे.
उद्धव ठाकरे शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. रायगड जिह्यात 1 व 2 फेब्रुवारी रोजी झंझावाती दौरा होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहे तर 2 फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या 6 सभा होणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयानंतर उद्धव ठाकरे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयावर येत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रायगड जिह्यात दौऱयावर येत
असल्याने त्याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अनंत गीते उपस्थित राहणार असल्याची माहिती दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम आणि रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
1 फेब्रुवारी – सकाळी 11 वा. पेण शहर हायस्कूल मैदान – दुपारी 2 वा. रेवदंडा हायस्कूल – संध्याकाळी 6 वा. उरुस मैदान, रोहे.
2 फेब्रुवारी – सकाळी 11 वा. देवीची सहान पोलादपूर – दुपारी 3 वा. म्हसळा शहर – संध्याकाळी 6वा. माणगाव-मोरबा रोड मैदान.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*