कोकणात सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी हे दोन लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे पुन्हा इच्छुक आहेत. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे दोन्ही इच्छुक उमेदवारांचे टेन्शन वाढवणार ठरला आहे.
या दोन्ही मतदारसंघातून भाजपाने निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे स्पष्ट मत भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. इतकेच नाही तर रायगड लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांच्या कामाचं कौतुक करत त्यांचं नाव सगळ्याच स्तरावर चर्चेत असल्याचे सांगत सुनील तटकरे यांचेही टेन्शन वाढवलं आहे.
रवींद्र चव्हाण यांनी रायगड लोकसभेमध्ये धैर्यशील पाटील यांचा असलेला प्रवास त्यांचा संपर्क आहे असं सांगत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
यामुळे आता लोकही विचार करायला लागले आहेत की, कोणाला तरी नवीन चांगल्या उमेदीच्या कार्यकर्त्याला या रायगड-रत्नागिरी लोकसभेमधून प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
वाढता पाठिंबा लक्षात घेता सर्व स्तरावर धैर्यशील पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचं स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी तुमचं नाव चर्चेत असल्याचे प्रश्न विचारला असता या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.
कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्व घेतं. पार्लमेंटरी बोर्ड सांगेल तो कार्यकर्ता या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवेल असे सांगत एकीकडे किरण सामंत यांचेही टेन्शन चव्हाण यांनी वाढवलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी असं सगळ्याच कार्यकर्त्यांचं मत आहे व या दोन्हीही मतदारसंघांमध्ये भाजपला वाढता पाठिंबा आहे, असं चव्हाण म्हणाले. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री चव्हाण यांनी दापोली येथील भाजपाच्या कार्यालय नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका जया साळवी,महिला आघाडीच्या स्मिता जावकर, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक, कामगार आघाडीचे स्वरूप महाजन आदी उपस्थित होते.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*