दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. पालगडला सोंडेघर धरणातील पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 9 महिने पगार मिळालेला नाही.
यामुळे ग्रामस्थांनी तहान भागविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पगाराविना उपासमारीची वेळ आली. स्वतः पाच अंकी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कामगारांची व्यथा कधी समजणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकण कट्टा लाईव्हने पालगडचे सरपंच अनिल कृष्णा बेलोसे यानां संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत आम्ही ग्रामसेवक जगन्नात जोडपे यानां संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
मात्र आम्ही याबाबत गावच्या लोकांजवळ संपर्क केला असता त्यांनी म्हटलं की अधिकारीच पैसे काढण्यासाठी चहापाणी द्या अशी मागणी करत आहेत त्यामुळे हे भ्रष्ट अधिकारी कोण अशी चर्चा गावात निर्माण झालीय.
या प्रश्नावर पालगड ग्रामपंचायतीने अजूनही खुलासा न केल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालाय. येणाऱ्या काही दिवसात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असताना पालगड ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्याचं नियोजन का केलं नाही हा देखिल प्रश्न आहे.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या नाकार्तेपणामुळे आज या कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय.
वडवली, पाचवली, माटवण, सोंडे घर आणि पालगड या पाच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याचा ठेका पालगड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
या गावांच्या ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार ९ महिने उलटून गेले तरी ग्रामपंचायत खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या गावांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















