दापोली : अखेर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं, पालगड ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

banner 468x60

दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, पाच अंकी पगार घेत असलेल्या अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष, सोंडेघर नळपाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांना 9 महिने पगार नाही.

या मथळ्याखाली कोकण कट्टा लाईव्हने ३ मार्चला बातमी दिली होती. कोकण कट्टा लाईव्हने याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्ही सदर ग्रामपंचायतीची बाजूही मांडत आहोत.

रत्नागिरी जिल्ह्य परिषदेला पालगड ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. या सगळ्या प्रकरणात पालगड ग्रामपंचायतीने आपली बाजू मांडलेली असून सदर कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

हा निधी देण्यासाठी पाणीपुरवठा विभाग चालढकल करत आहे. पालगड ग्रामपंचायतीने आता या प्रकरणावर कोकण कट्टा लाईव्हशी सविस्तर खुलासा केलाय. पालगडचे सरपंच अनिल कृष्णा बेलोसे यांनी म्हटलं

गेल्या नऊ महिन्यात चार वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणतंही उत्तर आलेलं नाही. पालगड ग्रामपंचायतने आपलं काम केलेलं आहे. आम्ही वडवली, पाचवली, माटवण, सोंडे घर आणि पालगड या पाच गावांना पाणीपुरवठा करण्याचा ठेका पालगड ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची सर्व जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची रत्नागिरीची आहे. दिवसाला ४४९ प्रमाणे प्रत्येकी कर्मचाऱ्याला देण्यात येतात. आता आम्ही सहा महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. तीन महिन्याचं वेतन अजूनही बाकी आहे याबाबत देखील आम्ही पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना देणार आहोत.

असं सरपंच अनिल कृष्णा बेलोसे यांनी सांगितलं. वडवली, पाचवली, माटवण, सोंडे घर आणि पालगड या पाच गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *