माजी खासदार निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये काहीवेळात सभा होणार आहे. या सभेसाठी ते चिपळूणमध्ये दाखल होताच त्यांच्या गाडीवर दगडफेक झालीय.
निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
मात्र चिपळूणमध्ये आल्यावर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झालीय. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दोन्हीकडून दगडफेक सुरू झाल्याची माहिती समोरयेतेय. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
निलेश राणेंच्या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत.
भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील 11 वर्षापासूनचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून हा अद्यापही कायम आहे. निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे.
भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात निलेश राणेंची जाहिर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. भास्कर जाधवांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी जाहिर सभा आयोजित केली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*