दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव

banner 468x60

दाभोळमध्ये गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडले आहेत. दाभोळमधील विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

हा प्रकार आज सकाळी समोर आलाय. दाभोळमधील प्रतीक वैद्य या विक्रेत्याकडे विजय बेकरीतून आलेल्या सहा पावात चक्क गुटखा खाऊन थुकल्याचं समोर आलं आहे.

banner 728x90

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

  आज सकाळी ही घटना समोर आल्यानंतर  हा पाव आहे की गुटखा पाव असा संभ्रम निर्माण झालाय. एक लादी पाव घेतली असता सहा पावांवर गुटखा खाल्याचं निदर्शनास आलं आहे.

या पावात सुपारीचे खंड होते , माझ्या मुलीने यामधील तीन पाव खाल्याचं प्रतिक वैद्य यांनी सांगितलंय.   

दरम्यान या प्रकारानंतर एफडीएकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आलाय. या घटनेनंतर बेकरीत मिळणाऱ्या  पावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

 यापदार्थ विक्रेत्यांकडे फूड विक्रीचे लायसन्स आहे का ? एफडीएचे नियम हे पाळतात का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *