लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.
त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर पाच वर्षे निवडणूक लढविणे, तसेच मतदान करण्यापासून बंदी घालावी, अशी कायदेशीर नोटीस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निवडणूक आयोगाला पाठविली आहे.
असीम सरोदे, किशोर वरक, श्रीया आवले यांच्यामार्फत पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे, की निवडणूक प्रचार ५ मे रोजी संपला असतानाही भाजप कार्यकर्ते ६ मे रोजी राणे यांचा प्रचार करीत होते.
प्रचार संपलेला असतानाही राणे समर्थक ईव्हीएम मशीन दाखवून राणे यांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.राणे यांचा मुलगा आमदार नीतेश यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, ‘राणे यांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाले नाही, तर आमच्याकडे निधी मागायला यायचे नाही.
लीड मिळाले नाही, तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही’, अशी धमकी १३ एप्रिलला झालेल्या सभेत नीतेश राणे यांनी दिल्याचाही उल्लेख नोटिसीत आहे.
अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आले आहेत.
हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहे- असीम सरोदे केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसांत या नोटिसीवर उत्तर द्यावे, अशी अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान देण्यात येईल – विनायक राऊत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















