Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : आरवली घाटात मद्यधुंद ट्रक चालकाची बसला धडक

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली घाट येथे दारुच्या नशेतील ट्रक चालकाने समोरुन येणार्‍या एसटीला धडक देत अपघात केला.अपघाताची ही घटना गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.13 वा.घडली आहे.

banner 728x90 banner 728x90


राहुल सुभाष जाधव (36,रा.माणगाव,रायगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.त्याच्या विरोधात एसटी चालक शालींद्र प्रभू सोनावणे (36,मुळ रा.बिड,सध्या रा.देवरुख) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार,गुरुवारी दुपारी शालींद्र सोनावणे आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-2057) घेउन करजुवे ते देवरुख असे प्रवासी घेउन जात होते.त्याच सुमारास संशयित राहुल जाधव हा दारुच्या नशेत आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-06-डब्ल्यू-8339) घेउन समोरुन गोवा ते मुंबई असा भरधाव वेगाने येत होता.

ही दोन्ही वाहने आरवली घाटात आली असता राहुलने ट्रक रस्त्याच्या विरुध्द बाजुला नेत समोरुन येणार्‍या एटीला धडक देत हा अपघात केला.त्यानंतर राहुलने घटनास्थळी न थांबता तिथून पळ काढला होता.याप्रकरणी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 279,मोटार वाहन कायदा कलम 184,185,134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *