मंडणगड : इको गाडीचा भीषण अपघात

banner 468x60

सकाळी मंडणगडमधील पालवणी रोडवरील क्लासिक फॉर्म जवळील नाल्यात पडून इको गाडीला भीषण अपघात झाला.

सदर गाडी ड्रायव्हर रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. या गाडीमध्ये २ जण होते.

यातील ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागरिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा अपघात इतका भीषण आहे की इको गाडीचा अक्षरशः चुराडा झाला असून सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली नाही.

याच रस्त्यावरील दरड आणि खड्डे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती अपघात झाल्यानंतर सुधारणा होणार? अशी संतप्त प्रतिक्रिया तालुकावासियांकडून येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *