खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड-भरणे मार्गावरील एसटी आगारासमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.

banner 728x90 banner 728x90

या प्रकरणी रूपेश सुनील शिगवण (४०, रा. शिवाजीनगर) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजान आरिफ बागवान (२३, रा. भोस्ते – जलालशहा मोहल्ला) असे जखमीचे नाव आहे. रूपेश शिगवण हा (एम.एच.०८/ एस. ६१२७ दुचाकी घेवून जात असताना दुसऱ्या दुचाकीला (एम.एच.०८/बी.डी. ६७१७) धडक दिली.

या बाबतची मिळताच पोलिसांनी माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या बाबत येथील पोलीस तपास करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *