खेड तालुक्यातील भरणे जि.प. गटातील जलजीवन मिशन योजनेतील कामांत मोठा गैरप्रकार होत असून अनेक योजनांतील भ्रष्टाचाराबाबत चर्चा सुरु आहे.
भरणे जि.प. गटातील कळंबणी बु. र येथील जल जीवन मिशन योजनेचे कामांत घडला असून लाखों रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी केला आहे.
मौजे कळंबणी बुटुक गावासाठी दोन कोटी रक्कमेची योजना मंजूर झाली असून तिचे काम सुरू आहे. परंतु, ते काम निकृष्ट व नियमबाह्य चालू असून ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
उपअभियंता के व अधिकारी ठेकेदारांचे पाठीशी असल्याने ठेकेदार राजरोसपणे निकृष्ट व नियमबाह्य कामे करत आहेत.
याबाबतीत पाणी पुरवठा विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सुरेश हंबीर यांनी सांगितले.
अंदाजपत्रकानुसार पाईप लाईनसाठी १ मीटरची खोदाई व ०.७५ मीटरची रुंदी आहे, पाईपखाली १५ सेमीचे मुरूम बेडिंग व पाईपवर चांगल्या मुरूमाणाची भर टाकावयाची आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र ४५ सें.मी. ही खोदाई केलेली नाही.
रुंदीही ३० सें.मी. नाही. मुरूमाचे बेडिंगही टाकले नसून वरच्यावर खोदाई करून पाईप टाकले गेले आहेत. खोदाई व दगडांचे ब्लास्टींगसाठी लाखो रुपयांची तरतूद असून देखील वरचेवर खोदाई केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















