रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकान्यांनी खेड एसटी आगाराला ५५ हजाराचा दंड ठोठावला आहे.
सन २०१७ पासून विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका खेड आगारावर ठेवण्यात आला आहे. हा दंड संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिले आहेत.
हा दंड सीट बेल्ट, अतिवेगाने वाहन चालवणे, वेग मर्यादांचे उल्लंघन करणे, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी दंड ठोठावला आहे. एकूण २४ वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशामुळे कर्मचान्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. आम्हाला दंड ठोठावण्यापूर्वी संबंधित कार्यशाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे.
वाहनांची अवस्था सुस्थितीत नसतानाही गाड्या कशा पासिंग झाल्या, असा प्रश्नही कर्मचान्यांनी उपस्थित केला आहे. सन २०१७ पासूनचा दंड वसूल। करण्यासाठी इतकी वर्षे का लागली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















