चिपळूण ताल्यक्यातील सावर्डे भुवडवाडीमधील ग्रामस्थांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या १० वर्षाच्या लढ्याला यश आलंय .
पाणी आणि शेती दुषित करणाऱ्या सावर्डे येथील कात इंडस्ट्री यांच्या सांडपाण्यामुळे जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचे सिध्द झाले असून या दोन्ही कंपन्या ७२ तासाच्या आत बंद करण्याचे आणि या इंडस्ट्रीजचे पाणी आणि वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिले आहेत.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील दोन कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवड वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या दूषित पाण्यासह शेतीचेही नुकसान अनेक वर्षे भोगावे लागते होते. तर या कात भट्ट्यांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते.
ग्रामस्थांच्या या समस्यांची दखल घेऊन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या भागाला भेट देत शासनाकडे याचा पाठपुरावा केला होता. अखेरीस ग्रामस्थांच्या या आंदोलनाला निलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आले असून या दोन्ही कात भट्ट्या ७२ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिले आहेत.
सावर्डे येथील कातभट्टीच्या जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास भुवड वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना होत होता. कातभट्टीचे पाणी नाल्यातून थेट नदीमध्ये जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली होती. परिसरात प्रचंड दुर्गंध पसरलेला असे. तसेच येथील बोअरवेल आणि विहीरींना प्रदूषित पाणी येते होते.
गेली कित्येक वर्षे हा त्रास ग्रामस्थ सहन करत होते. यासंदर्भात अनेक वेळा आवाज उठवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर ग्रामस्थांनी त्यांची व्यथा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सावर्डे येथील सचिन कात इंड्रस्टी आणि तिरूपथी कात इंड्रस्टी या दोन्ही कंपन्या असणाऱ्या परिसरातील व गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली व त्याचे तपासणी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केले.
याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने देतानाच या कात भट्ट्यांमुळे प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या दोन्ही कात कंपन्यांचे उत्पादन ७२ तासांच्या आत बंद करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित विभागांना पाणी आणि विज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*