भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र आहे, तरी विद्यमान संविधानिक व्यवस्थेत त्याला हिंदू राष्ट्र म्हणून दर्जा कुठे आहे? त्यामुळे संविधानाद्वारे भारताला हिंदू घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही.
त्यामुळे भावनात्मक विचार करण्यापेक्षा संविधानिक हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातनचे (Sanatana Dharma) चेतन राजहंस (Chetan Rajhans) यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय हिंदू-राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी साधनेचे महत्त्व या विषयावर सत्यवान कदम यांनी मार्गदर्शन केले.
धर्मशिक्षणासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे विचार श्री देव भार्गवराम परशुराम विश्वस्त अभय महाराज यांनी व्यक्त केले. अधिवेशनाला विविध संघटना, संप्रदाय, व्यावसायिक, राजकीय पक्षाचे १२० प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचा उद्देश हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांनी मांडला.
आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील भिडे, चिपळूण मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश गायकवाड, अधिवक्ता सचिन रेमणे, मिलिंद तांबे, टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत कदम, राजापूरच्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान महेश मयेकर, डॉ. धर्मश्री शेवाळे यांनी आपले अनुभव कथन केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













