मंडणगड तालुक्यातील अती महत्वाचा म्हणून रस्ता ओळखला जाणारा मंडणगड ते पाचरळ रस्ता अर्धवट अवस्थेत मंडणगड चेकपोस्ट पासून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे मात्र याकडे प्रशासनाचं लक्ष नाही.
या रस्त्यावर चिखलाच्या साम्राज्याने दुचाकी व तीन चाकी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात घसरून अपघात होत आहे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे पहिलाच पावसात ही भयानक अवस्था झाली असल्याने या बाबीकडे स्थानिक प्रतिनिधीनी लक्ष देणे गरजेचे आहे.
याबाबत त्वरित कारवाई झाली नाही तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सचिव जमीर माखजनकर यांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















