लांजा : महिलेला फुस लावून पळवून नेणाऱ्या प्रौढाला अटक

banner 468x60

तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथील एका ४८ वर्षीय महिलेच्या फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका प्रौढाला अटक केली आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेंद्र गोविंद गुरव (५३, रा. कोंड्ये गुरववाडी) असे प्रौढाचे नाव आहे.

कोंड्ये रांबाडेवाडी येथील ४८ वर्षीय महिला दि. २९ जुलै २०१३ रोजी सकाळी ११ वाजता घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या पतीने लांजा पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांकडून बेपत्ता महिलेचा शोध सुरू होता. दरम्यान, या महिलेच्या बेपत्ताप्रकरणी बुधवारी (११ ऑक्टोबर) महिलेच्या पतीने कोंड्ये गुरववाडी येथील राजेंद्र गोविंद गुरव (५३) याने फूस लावून तिला पळून नेल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्याच्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी राजेंद्र गुरव याला अटक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *