दुसर्या टप्प्यातील मोसमी पावसाने आता कोकण किनारपट्टी भागात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसा उसंत घेत वाटचाल करणारा पाऊस रात्री तुफान बरसला. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
पुढील दोन दिवस कोकणातील पाचही जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये गुरुवार व शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती.पश्चिम वार्याचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर अंतरावर असल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी जगबुडी, शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीतील जलस्तर इशारा पातळीवर असल्याने प्रशासनाने या नद्यांच्या परिसरातील गावांत सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांत चिपळूण तालुक्यात उद्भवलेली पूरस्थिती शुक्रवारी काही प्रमाणात ओसरली असून स्थिती नियंत्रणात असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
संभाव्य आपत्तीची शक्यता लक्षात घेेऊन खबरदारीच्या उपायायोजना म्हणून खेड तालुक्यातील रघुवीर घाट दळणवळणासाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर ओसरलेला होता. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी , लांजा आणि राजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम होता.
शुक्रवारी जिल्ह्यात 52.89. मि.मी .च्या सरासरीने 476 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात 20 मि.मी., दापोली 10, खेड 36, गुहागर 18, चिपळूण 35, संगमेश्वर 92, रत्नागिरी 75, लांजा तालुक्यात 99 आणि राजापूर तालुक्यात 91 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात झाला. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात झाला आहे.
पावसाने यंदा जुलैैच्या अखेरच्या टप्प्यात जोर धरला असून सरासरी दीडहजार मि.मी. ची वाटचाल सुरू केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस अद्यापही सरासरी 500 मि.मी. पिछाडीवर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















