मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने धावणार आहे.
दिनांक 14 मे रोजी कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी
सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून १५ मिनिटांपर्यंत असा सुमारे अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. उडूपी ते सुरतकल दरम्यान घेण्यात येणाऱ्या या
मेगा ब्लॉकमुळे दिनांक 13 मे 2024 रोजी मुंबईतून मंगळूरू जंक्शनसाठी सुटलेली दैनंदिन सुपरफास्ट गाडी (12133) मडगाव आणि उडुपी दरम्यान एक तास 30 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















