कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे भरलेल्या कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली.
याचवेळी हार्बर मार्ग बोरीवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे,
गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीला जोडण्यात यावा तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करण्यात यावी अशा तीन मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार या तिन्ही कामांना
मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी 826 कोटी रूपयांची तर नायगाव – जूईचंद्र बायपाससाठी 176 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















