कोकण : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण बोर्ड अव्वल! कोकण बोर्डाचा 97.71 टक्के निकाल

banner 468x60

दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना

http://mahresult.nic.in

या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

कोकण बोर्डाने ९७.७१ टक्के निकालासह राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर ९१.९५ टक्के निकालासह मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल नोंदवला आहे.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडल्या. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. यंदा बारावीचा एकूण निकाल ९३.३७% लागला.

यंदा मुलांपेक्षा 3.८४ टक्क्यांनी मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विभागवार निकाल पुढीलप्रमाणे:-

कोकण – 97.91 %, पुणे – 94.44 %, मुंबई – 91.95 %, औरंगाबाद – 94.08 %, नाशिक – 94.17 %, कोल्हापूर -94.24 %, अमरावती- 93.00 %, लातूर- 92.36 %, नागपूर- 92.12 %

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *