खेड : गाळमुक्त आणि पूरमुक्त होणार योगेश कदम यांनी सांगितलं प्लान, जगबुडीतील गाळाचा प्रश्न सुटणार

banner 468x60

खेड येथील जगबुडी नदी गाळमुक्त व खेड शहर पुरमुक्त होणार असल्याची माहिती मंडणगड दापोली खेडचे आमदार योगेश कदम यांनी सोमवारी रात्री शहर शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

banner 728x90

यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी जि.प. सभापती आण्णा कदम, भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार योगेश कदम म्हणाले, गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेमधून ९० लाखांच्या निधीची तरतूद केली होती, मात्र सी. आर. झेड. च्या अडचणीमुळे हे काम होऊ शकले नाही त्यानंतर झालेल्या

जुलैच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने २ कोटी ७५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने निधीचा प्रश्न मार्गी लागला आहे.


पर्यावरण सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रशासित कमिटीच्या बैठकीतील मिनिट्स येत्या ४/५ दिवसांत मिळाल्यानंतर लगेचच कामास सुरुवात होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *