खेड : कन्याशाळेच्या दोन इमारती पडझडीच्या उंबरठ्यावर

banner 468x60

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवनव्या योजनांचे नगारे वाजवत असले तरी दुसरीकडे मात्र पडझडीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळामध्येच जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना घडे गिरवावे लागत आहेत.

banner 728x90

जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या शहरातील कन्याशाळेच्या दोन इमारतींमध्ये यंदाही विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने पालकांची चिंता कायम आहे.

शाळा दुरुस्तीचे शिक्षण विभागाला इतके बावडे का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून दुर्घटना घडल्यानंतरच जिल्हा शिक्षण विभागाला जाग येणार का, असा उद्विग्न सवालही पालकांमधून उपस्थित केले जात आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कन्याशाळेच्या दोन इमारतीमध्ये 8 वर्गखोल्या आहेत.

4थी पर्यंतचे वर्ग असणार्‍या दोन्ही इमारतीच्या दुरुस्तीचे घोंगडे भिजत पडल्याने पटसंख्या देखील कमी होत चालली आहे. तरी देखील शिक्षण विभाग अजूनही निद्रिस्त आहे. यंदाही शाळेतील 25 हुन अधिक विद्यार्थ्यांवर घोक्याची टांगती तलवार कायम आहे.

केंद्रशाळा व बीट शाळा असलेल्या कन्याशाळेत विस्तार अधिकार्‍यांसह केंद्रप्रमुखांचे देखील कार्यालय आहे. कन्या शाळेच्या दुरुस्ती बाबत सातत्याने पत्रव्यवहार करून देखील जिल्हा प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याने पालक देखील पाल्यांना शाळेत पाठवण्यास नाखुष आहेत.

दुसरीकडे पावसाळ्यात इमारत परिसरात नारिंगी नदीच्या पुराचे पाणी साचत असल्याने शाळा बंद ठेवण्याची नामुष्की देखील वर्षानुवर्षे ओढवत आहे.

वास्तविक, कन्याशाळेच्या दुरुस्तीबरोबरच तिची पुराच्या पाण्यातून सुटका होणे आवश्यक आहे. मात्र, ही बाब शिक्षण विभाग प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

banner 728x90