‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ याचा प्रत्यय खेडमध्ये आला आहे. पत्रकाराने बातमी केली म्हणून त्यांना धमकी देण्यात आली. रामचंद्र बुदरला वीजचोरी केली याचा पुरस्कार मिळावा असं अपेक्षित असेल बहुदा जी बातमी झाल्यावर वीजचोरी करणाऱ्या लोकांना एवढा राग येतो.
महावितरणच्या दोन कमर्शियल मीटर मध्ये छेडछाड करून तब्बल 26 लाख रुपये किमतीची वीज चोरी केली आहे. बातमी कारणे हे पत्रकाराचं काम आहे.
मात्र एकादी बातमी केली म्हणून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आलाय. रामचंद्र बुदरची मग्रुरी खेड पोलीस उतरवतील हे पहावं लागेल मात्र अश्या मग्रुरी करणाऱ्या लोकांना अद्दल घडणं गरजेचं आहे.
एकाद्या गरीब कुटुंबाने विजबिल न भरणाऱ्या नागरिकांविरोधात महावितरण वीज कापण्याची कारवाई करते ते ही अगदी 300-400 रुपयासाठी मात्र येथे तब्बल 26 लाखाची वीजचोरी होते हा प्रकार महावितरणच्या लक्ष्यात येत नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे.
खेड मधील मुळगाव येथील जांभा खाणीवर महावितरणने लाखो रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी केली म्हणून खेडमधील पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकारणी मंगळवारी सायंकाळी फोन वरून धमकवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात धमकी चा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार चंद्रकांत बनकर यांना अनोळखी नंबर वरून जीवे ठार मारण्याची धमकी आली असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भा.द.वी.स कलम ५०४,५०६,५०७ तसेच महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार मध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१७ चे कलम 3.४. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते करत आहेत .
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक १८ मे रोजी खेड तालुक्यातील मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटर मध्ये वीजचोरी झाल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली,
त्यानंतर महावितरण ने तब्बल २६ लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खान मालकाला दिली या महावितरण च्या या कारवाईची बातमी लावल्याचा रागातून १९ मे रोजी चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तब्बल तीन वेळा धमकीचे फोन आले, त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक
अनोळखी मोबाईल नंबर वरून ते घरी असताना कॉल आला, जांभ्याच्या खाणींच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील, बातम्यांसाठी कसा
फिरता ते बघतो, ऑफिस ला येऊन आमची मुले राडा घालतील, अशाप्रकारे व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, याबाबत सोमवारी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी या घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*