गावातील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार, २३ एप्रिल २०२४ रोजी होत आहे.
ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वत रांगावर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे.
या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्रीरामवरदायिनी माता आदीशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे. देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रद्धेने साजरे केले जातात.
देवीचे मंदिर हेमाडपंती असून, हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवून आणण्यात आली आहे.
अशा या जागृत देवीची यात्रा मंगळवार २३ एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार आहे. हा परंपरागत देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळी आप्तेष्टांसह उपस्थित रहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा,
असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ चोरवणे, मुंबई पुणे यांनी केले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*