खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक

banner 468x60

तालुक्यातील वेरळ येथील रेल्वेस्टेशन जवळील पुनम अपार्टमेंटमधील एका व्यक्तीला अज्ञाताने मोबाईल वर मेसेज करून

आपण वीजबिल भरले नसल्याचे सांगून त्यांची ३ लाखांची फसवणूक केली.

banner 728x90

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

सदर घटना बुधवारी (ता. २६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एका बँकेच्या खात्यातून ९९ हजार ९९९ व दुसऱ्या बँकेच्या बचत खात्यातून १ लाख ९९ हजार ९९७ असे एकूण २ लाख ९९ हजार ९९६ रुपये वर्ग करून फिर्यादीची फसवणूक केली.

या प्रकरणी फिर्यादी यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *