खेडमध्ये एका बॅनरवरुन राजकीय वाद समोर आले आहेत. आचारसंहितेतली पहिली तक्रार बॅनरबाजी वरून दाखल करण्यात आली आहे.
संमती नसताना घराच्या कंपाउंडवर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार व्यावसायिक सदानंद कदम यांनी खेड पोलिसात दिली आहे.
रामदास कदम आणि आपले कौटुंबिक वाद सर्वश्रुत असताना आपली राजकीय फायद्यासाठी बदनामी होत असल्याचा सदानंद कदम यांच्या तक्रारीत आरोप केला आहे. प्रशासनाने हा बॅनर काढावा अन्यथा आपण स्वतःहून काढणार असेही सदानंद कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शिमगोत्सवानिमित्त जामगे या त्यांच्या निवासस्थानी लावण्यात आलेला बॅनर या वादाला निमित्त ठरला आहे. सदानंद कदम यांच्या जामगे येथील घराच्या कंपाउंडवर त्यांची संमती नसताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी बॅनर लावला आहे.
या बॅनरवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायद्यासाठी आपला फोटो लावला आहे. सोबत आमदार योगेश कदम यांचा व अन्य लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. हा राजकीय डाव असून, आपले रामदास कदम यांच्याशी कौटुंबिक वाद आहेत.
नुकत्याच मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो आहे. राजकीय फायद्यासाठी आपल्या घरावर अनधिकृतरीत्या परवानगी नसताना लावण्यात आलेला बॅनर तात्काळ हटवावा अन्यथा मला स्वतःला हटवावा लागेल.
हे करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करावी असेही उद्योजक सदानंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
आपली केलेल्या बदनामीची भरपाई करण्यासाठी समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला देखील खुलासा करण्यासाठी बॅनर लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील सदानंद कदम यांनी केली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*