खेड : शिमगोत्सवासाठी ठाणे-खेड एसटी सुरु

banner 468x60

ठाणे एसटी विभागाकडून शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २२ ते ३१ मार्च या कालावधीत जादा ठाणे- खेड बसफेरी चालवण्यात येणार आहे.

banner 728x90 banner 728x90

ठाणे-कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

राज्य परिवहन ठाणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी याबाबत लेखी पत्र त्यांना दिले आहे. शिमगोत्सवासाठी ठाणे, महाड, विन्हेरे – तुळशी-खेड मार्गावर होळीनिमित्त जादा गाडी सुरु करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती.

या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. २२ मार्चपासून बसफेरी धावणार असून, आरक्षणही खुले झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *