पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या भरणे-जगबुडी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने कहर केल्याने नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.
पाणीसाठ्यात घट झाल्याने नदीपात्रातील झुडपे दृष्टीस पडत आहेत. ही झुडपे तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. मुबलक पाऊस पडूनही जगबुडी नदीपात्र कोरडे पडत आहे.
यावर्षी मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडी नदीपात्रात जानेवारी अखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा होता. सद्यःस्थितीत मात्र पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. नदीपात्र झाडीझुडपांच्या वेढात अडकले आहे.
ही झाडी तोडण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही याशिवाय नदीपात्रात गाळाचे प्रमाणही तितकेच आहे. नदीपात्रातील झुडपे तोडल्यास नदीपात्रात मुबलक प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो.
ही झुडपे तोडण्यासाठी कोणीच तसदी घेत नसल्याने वर्षानुवर्षे नदीपात्रातच राहणाऱ्या झुडपांची वाढ होऊन पाणी अडण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















