खेडमध्ये भीषण अपघात, मुंबई कडून गावी येणाऱ्या प्रवाशांच्या कारला अपघात

Screenshot

banner 468x60

मुंबईहून कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात आंबवली येथे आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

खेड तालुक्यात महाळुंगे येथे हा अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी 12 जून रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास झाला आहे चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे

कार रस्त्यावर उलटून झालेला अपघातात कारमधील पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे तर एका युवकाचा समावेश आहे तर अन्य दोन इसमही जखमी आहेत.

हे अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात जखमींना तात्काळ दाखल करण्यात आल आहे.


हा अपघात भीषण होता की कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली त्यामुळे कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबई येथे हलवण्यात आल आहे.

अन्य जखमींवर खेड कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात ग्रस्त आपल्या गावी खेड आंबवली येथे येत होते त्यावेळेला ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *