खेड : गांजा ओढण्यास विरोध केल्याने चाकूने हल्ला, सवणस मोहल्ला येथील घटना

banner 468x60

खेडमध्ये गांजा ओढण्यास विरोध केल्याने चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घरासमोरील पिकअप् शेडमध्ये गांजा पित असताना पाहिल्यानंतर एका ४५ वर्षीय प्रौढावर गावातील दोघांनी चाकूचा वार करून हल्ला केलाय.

ही घटना ८ मे रात्री १०.३० वा.च्या सुमारास सवणस खुर्द मोहल्ला येथे घडलीय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाकीब अब्दुल सलाम सुर्वे (वय ४०), तलत अब्दुल सलाम सुर्वे (४४, दोन्ही रा. सवणस खुर्द मोहल्ला) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यामध्ये फिर्यादी शेख दाउद आदम सुर्वे (४५, रा. सवनस खुर्द मोहल्ला, ता. खेड) हे जखमी झाले आहेत.

यातील फिर्यादी व संशयित एकाच गावातील राहणारे असून, यातील संशयित हे फिर्यादी यांच्या घरासमोरील एसटी पिकअप् शेडमध्ये गांजा पित असताना आढळले म्हणून फिर्यादी यांनी त्यांना दोनवेळा समज दिली होती.

त्या रागाने फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत मशिदीसमोर रोडवर बोलत असताना दोन संशयितांनी फिर्यादी यांना शिवीगाळ

करून त्यांच्याजवळ असलेल्या सुऱ्याने डाव्या हातावर दोन वार आणि उजव्या हाताच्या करंगळीवर तिसरा वार केला. त्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *