खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजीनियरिंग समोर गुरुवारी रिक्षा टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला.
या अपघातात जीवित हानी टळली मात्र रिक्षाचा चुराडा झाला. घटनास्थळी खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधानामूळे अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत झाली.
गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास खेड वरून दापोली येथे जाणार्या एका रिक्षाचा सुर्वे इंजिनिअरींग येथे भिषण अपघात झाला. या अपघाता मध्ये २ माहिला, २ लहान मुली, १ पुरूषा सोबत चालक आणि २ महिन्याच्या लहान मुलीचा देखील समावेश होता.
खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
वैभव खेडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे जखमींना उपचारासाठी मदत मिळाली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*